Home संगमनेर Accident | संगमनेर: पिकअपला धडकून झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार

Accident | संगमनेर: पिकअपला धडकून झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार

young man was killed on the spot in a collision with a pickup Accident

Sangamner | संगमनेर: पिकअपला दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कोकणगाव शिवारात घडली. हा अपघात (Accident) सोमवारी रात्री घडला.

पिकअपला धडकल्याने दुचाकीस्वार गीताराम भिकाजी गुळवे वय ३२ रा. रहिमपूर हा तरुण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोकणगाव येथे घडली. पिकअप (एम.एच. २० एटी ७१३४) व दुचाकीस्वार संगमनेरच्या दिशेने जात होते. गुळवेने पिकअपला जोराची धडक दिली. या अपघातात गुळवे जागीच ठार झाला. पळून जाणाऱ्या पिकअप चालकाला नागरिकांनी पकडले. मंगळवारी सकाळी शवविचेदननंतर गीताराम गुळवे यांच्यावर शोकाकुल वातावरणात रहिमपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.  

Web Title:  young man was killed on the spot in a collision with a pickup Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here