Home Maharashtra News धक्कादायक! नागपूरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पेन्शनर महिला चालवते व्यवसाय

धक्कादायक! नागपूरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पेन्शनर महिला चालवते व्यवसाय

Sex racket exposed in Nagpur, business run by pensioner women

नागपूर | Nagpur: नागपूर शहरातील एका सेक्स रॅकेटचा (Sex racket) पदर्फाश करण्यात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला यश आले आहे. हुडकेश्वर पोलीस ठाणे परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये विशेष म्हणजे, चक्क एक पेन्शनर महिला हे सेक्स रॅकेट चालवत असल्याची, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेखा उर्फ अनिता पाचपोर असे सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेचे नाव आहे.

या कारवाई दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर सूत्रधार पेन्शनर महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिला ही नियमित पतीची पेन्शनही घेत होती, अशी माहिती समोर आली आहे. रेखा उर्फ अनिता पाचपोर ही महिला वेश्या व्यवसाय चालवत होती. नरसाळा मार्ग येथील संत ज्ञानेश्वर नगरात (prostitution Business) हा धक्कादायक प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी लगेचच कारवाई केली.

पोलिसांनी एक सापळा रचत तसेच खोटा ग्राहक त्याठिकाणी पाठवला. हा ग्राहक त्याठिकाणी पोहोचल्यावर वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्याठिकाणी लगेचच छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

Web Title: Sex racket exposed in Nagpur, business run by pensioner women

Previous articleमोठी बातमी! मीठ कारखान्याची भिंत कोसळून 12 जणांचा मृत्यू- Accident
Next articleAccident | संगमनेर: पिकअपला धडकून झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here