मोठी बातमी! मीठ कारखान्याची भिंत कोसळून 12 जणांचा मृत्यू- Accident
वृत्तसंस्था: गुजरातमधील मोरबी येथे एक मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. येथील हलवड जीआयडीसीमध्ये मीठ कारखान्याची भिंत कोसळून या अपघातात (Accident) १२ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अजूनही १५ हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोरबीच्या मीठ कारखान्यात झालेल्या दुर्घटनेनंतर या घटनेचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. भिंत पडल्याने तिथल्या मिठाच्या गोण्या खाली पडल्याचे दिसून येते. मिठाच्या गोण्याखाली अनेक लोक गाडले गेले असल्याची माहिती मिळत आहे.
स्थानिक लोक आणि कारखान्याचे कामगार भिंतीवरील मलबा आणि पोत्या काढून खाली गाडलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ढिगाऱ्याखाली आणि पोत्यांखाली आणखी लोक दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Web Title: 15 killed as wall of salt factory collapses