पुणे | Pune: पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात शुक्रवारी झालेल्या वादळ वाऱ्यात पिंपळे येथे झाड अंगावर कोसळून नवविवाहित जोडप्याचा मृत्यू (Die) झाल्याची घटना घडली होती. यामध्ये सात वर्षाची भाची गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास तिचाही मृत्यू झाला.
२२ एप्रिल रोजी सायंकाळी पुरंदर तालुक्यात पाउस व वादळ वारा सुरु झाला होता. यावेळी परिंचे येथील रेनुकेश गुणशेखर २९ व त्यांची पत्नी सारिका जाधव वय २३ त्याचबरोबर त्यांची भाची ईश्वरी संदेश देशमुख हे सासवडहून परिंचेकडे मोटारसायकलवर जात असताना साधारणतः सात वाजेच्या सुमारास पिंपळे येथून जात असताना रस्त्याशेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांची भाची गंभीर जखमी झाली होती. बेशुद्ध अवस्थेत असल्याने ईश्वरी हिला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. मात्र शनिवारी पहाटे या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Husband, wife and Chimurdi die after a tree falls on them