Home औरंगाबाद मुल होत नाही, नवरा म्हणाला जीव दे; महिला थेट तलावावर पोहचली अन्….

मुल होत नाही, नवरा म्हणाला जीव दे; महिला थेट तलावावर पोहचली अन्….

Aurangabad: पतीच्या छळाला कंटाळून २७ वर्षीय महिलेचा तलाव गाठत आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न.

husband's harassment, a 27-year-old woman attempted suicide

औरंगाबाद:  हर्सूल तलाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न होऊन 12 वर्षे झाल्यानंतरही मुल होत नाही, त्यामुळे तू कुठेतरी जाऊन जीव दे, म्हणजे मी दुसरे लग्न करतो’ असे पतीने पत्नीला म्हणत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. अशा रोजच्याच छळाला कंटाळून 27 वर्षीय महिलेने रागाच्या भारात हर्सूल तलाव गाठत आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला. ही घटना 19 फेब्रुवारीच्या दुपारी तीन वाजेदरम्यान घडली. सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठी अनर्थ टळला आहे.

१९ फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त मिरवणुका, विविध कार्यक्रमांची तयारी सुरु असल्याने शहरातील चौकाचौकात गर्दी असतानाच हर्सूल तलाव येथे कार्यरत असणाऱ्या सुरक्षारक्षकांचा दामिनी पथकाला फोन आला. एक महिला जीव देण्यासाठी आली असून, तत्काळ येण्याचे कळविले. दामिनी पथकाच्या पोलिस नाईक सुजाता खरात-जाधव आणि चालक प्रियंका भिवसने तत्काळ हर्सूल तलाव परिसरात पोहचल्या. तसेच त्यांनी सुरुवातीला आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला ताब्यात घेतले.

दामिनी पथकाने आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिलेची समजूत काढत तिला हर्सूल पोलिस ठाण्यात नेले. तसेच तिच्या पतीलाही बोलावून घेतले. समूपदेशनानंतर पतीने पोलिसांसमोर पत्नीची माफी मागत पत्नीस त्रास देणार नसल्याचे कबुल केले. मात्र आजवर पत्नीला त्रास देत असल्याने तिने पतीविरोधात तक्रार अर्ज दिल्याचे पथकाकडून सांगण्यात आले. ही कार्यवाही दामिनीच्या प्रमुख तथा पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे, सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनीच्या सुजाता खरात-जाधव आणि प्रियंका भिवसने यांनी पार पाडली.

Web Title: husband’s harassment, a 27-year-old woman attempted suicide

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here