Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: अभियांत्रिकी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थीनीची आत्महत्या

अहमदनगर ब्रेकिंग: अभियांत्रिकी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थीनीची आत्महत्या

Ahmednagar News: अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंग शाखेत शिकत असताना कॉलेजच्या वस्तीगृहातच एका विद्यार्थीनीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Student commits suicide in engineering college hostel

श्रीगोंदा: शहरातील एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंग शाखेत शिकत असताना कॉलेजच्या वस्तीगृहातच एका विद्यार्थीनीने दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विद्यार्थिनीने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समोर आले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका दुर्गम खेडेगावात वास्तव्य असलेल्या आणि शिक्षणा निमित्त श्रीगोंदा शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आज दिनांक 22 फेब्रुवारी 2023 बुधवार रोजी दुपारी होस्टेलच्या रूममध्ये पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये कॉलेजच्या मुख्यध्यापकांना आढळून आला. सदर मुलगी दरवाजा उघडत नसल्याने काही महिला शिक्षकांनी नमूद बाब प्राध्यापकांना सांगितली.

यावर नमूद खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर सदर सर्व प्रकार समोर आला. या घटनेबाबत अमोल नागवडे यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला खबर दिली. विद्यार्थिनीने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस निरीक्षक रामराव ढीकले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय महेश जानकर पुढील तपास करत आहेत.

Web Title: Student commits suicide in engineering college hostel

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here