Home अकोले रस्ता लुट करणारी टोळी अकोले पोलिसांनी केली गजाआड, आरोपी संगमनेरचे

रस्ता लुट करणारी टोळी अकोले पोलिसांनी केली गजाआड, आरोपी संगमनेरचे

Akole News: वृध्द व्यक्तीस मारहाण करून पैशाची लूट करणारी टोळी मुद्देमालासह अकोले पोलिसांनी जेरबंद (Arrested) केली.

Akole Police Arrested a road looting gang

अकोले: अकोले तालुक्यातील समशेरपूर परिसरात वृध्द व्यक्तीस मारहाण करून पैशाची लूट करणारी टोळी मुद्देमालासह अकोले पोलिसांनी जेरबंद केली आहे. गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल असा एकूण २ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अविनाश उर्फ बाळ्या कारभारी विधाते वय २८, लखन डेरसिंग माचरेकर वय २५, प्रेम विजय वाल्हेकर वय २१, प्रशांत मंगलदास गिर्हे वय २२ सर्व रा. घुलेवाडी ता. संगमनेर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास समशेरपूर येथून ठाणगावकडे जात असताना चिचखांड परिसरात चार अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेचे डेली कलेक्शन करणार्‍या तक्रारदारास अडविले. त्यांना गाडीवरून खाली ढकलून देऊन मारहाण करून त्यांचेकडील रोख रक्कम व मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला होता. आरोपी हे त्यांचेकडील दोन मोटार सायकलवरून पळून गेल्याची घटना घडली होती.

याबाबत अकोले पोलीस गुरनं 86/2023 भा.दं.वि. कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची माहिती मिळताच बिट अंमलदार यांनी तात्काळ समशेरपूर दूरक्षेत्र हद्दीत गावातील लोकांना फोनव्दारे माहिती देऊन चार अज्ञात इसमांचा शोध सुरू केला. सदर आरोपी मुथाळणे गावाच्या परिसरात डोंगरात लपलेले असल्याची माहिती मिळाल्याने अकोले पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला असता आरोपी अंधाराचा फायदा घेऊन त्यांचेकडील मोटारसायकल सोडून पळून गेले.

Web Title: Akole Police Arrested a road looting gang

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here