Home बीड संतापजनक व घृणास्पद! भीक मागणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार

संतापजनक व घृणास्पद! भीक मागणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार

Beed Crime News: अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार (Abuse) केल्याची संतापजनक व घृणास्पद घटना.

Abuse of a begging girl

बीड : आईसोबत भीक मागत कफल्लक अवस्थेत फिरणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची संतापजनक व घृणास्पद घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलातील शौचालयात घडली. या घटनेनंतर पोलिसांनी चार तासांत अल्पवयीन आरोपीला पकडले.

पीडितेची आई अंध असून, मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता आईजवळ खेळत असताना १५ वर्षीय मुलाने तिला २० रुपयांची नोट दाखवून स्वत:जवळ बोलावले. आणि तिला दूर घेऊन गेला. तेथे पडलेल्या एका मछाने तिचे हात बांधले व त्यानंतर तिच्याशी कुकर्म केले.  हे कृत्य करून पळाल्यावर तो पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराने मैदानात आला. व्हॉलिबॉल मैदानावर बसून त्याने पोलिसांच्या सर्व हालचाली पाहिल्या. पावणेबारा वाजता दुचाकीला लिफ्ट मागून भाजीमंडईतून जात असताना त्यास पोलिसांनी पकडले. आरोपी अल्पवयीन मुलाने सुरुवातीला दोन तास पोलिसांची दिशाभूल केली. अखेर विश्वासात घेतल्यावर घटनास्थळी पोलिस अधी- क्षकांसमोर त्याने गुन्ह्याचा पट उलगडला.

Web Title: Abuse of a begging girl

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here