शिक्षकांनीच फोडला इंग्रजीचा पेपर, सहा शिक्षकांवर गुन्हा
Crime News: विद्यार्थ्यांना कॉप्या पुरविण्याच्या उद्देशाने पेपरचे फोटो काढून काही शिक्षक त्याच्या कॉप्या बनवत असताना आढळले.
सोनपेठ | परभणी : बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला बुधवारी पहिल्याच दिवशी सोनपेठच्या महालिंगेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना कॉप्या पुरविण्याच्या उद्देशाने पेपरचे फोटो काढून काही शिक्षक त्याच्या कॉप्या बनवत असताना आढळले. त्या सहा शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका घरात विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्याच्या उद्देशाने पेपरचे फोटो काढून त्याच्या कॉप्या बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी बालाजी किशनराव बुलबुले, गणेश अंकुशराव जयंतपाळ, भास्कर बापूराव तिरमले हे त्यांच्या मोबाइलवर इंग्रजीचा पेपर घेऊन मुलांना कॉपी पुरविण्याकरिता कॉपी तयार करताना मिळून आले. चौकशी केली असता शिक्षक रमेश मारुती शिंदे, सिद्धार्थ सावजी सोनाळे यांच्या मोबाइलवरून पेपर पाठविला जात असल्याचे निदर्शनास आले. उपकेंद्र संचालक कालिदास कुलकर्णी यांनी यात मदत केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी केंद्र संचालक गोविंद लहाने यांनी सोनपेठ ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला.
मुख्य सूत्रधार गवसला यवतमाळमधील मुकुटबन येथील पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. रोहित भटवलकर (२४) असे आरोपीचे आहे.
Web Title: teachers themselves broke the English paper, a crime against six teachers
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App