Home पुणे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन सुरूच

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन सुरूच

माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार, उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार.

agitation of junior college teachers continues

मुंबई: बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी बुधवारी चर्चा केली.

या बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी शिक्षक संघाच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दाखविली असली तरी बैठकीचे लिखित इतिवृत्त हाती मिळत नाही तोपर्यंत बहिष्कार आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने जाईल.

घेतला आहे. बैठकीमध्ये २००५ पूर्वी अंशतः अनुदानित किंवा विनाअनुदानित सेवेत असलेल्या व नंतर अनुदानित सेवेतून निवृत्त झालेल्या शिक्षकांना पेन्शन योजनेचे कोणते लाभ देता येणे हे शक्य आहे, याचा विचार करून दीड महिन्याने पुन्हा बैठक घेऊन या बाबतीत अंतिम निर्णय दिला जाईल. याशिवाय वाढीव पदांना मान्यता देताना याबाबतचा येणारा खर्च लक्षात घेऊन एक महिन्याच्या आत निर्णय दिला जाईल, तसेच आयटी शिक्षकांना अनुदान देता येईल किंवा कसे, याबाबत अभ्यास करून पुढील बैठकीत निर्णय घेतला.

Web Title: agitation of junior college teachers continues

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here