Home महाराष्ट्र चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीने स्वत:लाही संपवलं

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीने स्वत:लाही संपवलं

Nashik Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने तिचा गळा आवळून खून (Murder) केल्याची घटना तसेच त्यानंतर स्वत:देखील गळफास घेऊन आत्महत्या.

husband also killed himself by murder his wife due to suspicion of character

नाशिक: नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने तिचा गळा आवळून खून केल्याची घटना तसेच त्यानंतर स्वत:देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. नाशिकच्या चुंचाळे परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी पती-पत्नीचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

मनीषा भुजंग तायडे आणि भुजंग अश्रू तायडे  अशी मृत्युमुखी पडलेल्या पती पत्नीची नावे आहेत. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह त्यांच्या चुंचाळे येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पती भुजंग आणि पत्नी मनीषा यांच्यात कौटुंबीक कारणातून सतत वाद होत होते. पती भुजंग याला पत्नी मनीषाच्या चारित्र्यावर संशय होता. यातून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. दरम्यान, दोघांमध्ये बुधवारी पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की पती भुजंग याने पत्नी मनीषा हिची गळा आवळून हत्या केली.

त्यानंतर त्याने किचनमधील फॅनला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. बराच वेळ होऊनही दोघे घराचे दार उघडत नसल्याने शेजारच्यांनी खिडकीतून डोकावून बघितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शेजारच्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

माहिती मिळताच, मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

Web Title: husband also killed himself by Murder his wife due to suspicion of character

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here