इंस्टाग्रामवरून ओळख, नगरमध्ये लॉजवर नेऊन महिलेवर अत्याचार
Breaking News | Ahmednagar: इंस्टाग्रामवरून ओळख करत अहमदनगर शहरात बोलावून घेत एका विवाहितेवर लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.
अहमदनगर : इंस्टाग्रामवरून ओळख करत अहमदनगर शहरात बोलावून घेत एका विवाहितेवर लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमीर हसन शेख (रा. शिक्रापूर, जि. पुणे) यास कोतवाली पोलिसांनी शिक्रापूर येथून शुक्रवारी अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिलेशी आरोपीने इंस्टाग्रामवरून ओळख वाढविली. त्याने २८ डिसेंबर रोजी पीडितेला अहमदनगर शहरातील पुणे बसस्थानक येथे भेटण्यासाठी बोलविले. पीडित महिलाही मुलासह बसस्थानक परिसरात आली. आपण कुठे तरी निवांत बसून बोलू, असे म्हणत आरोपीने पीडितेला दुचाकीवर बसविले. तेथून तो पीडित महिलेला घेऊन शहरातील एका लॉजवर गेला. लॉजवर पोहोचल्यानंतर मारहाण करत पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेने फोनवरून आरोपीला विचारणा केली असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
कोतवाली पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. त्यास शिक्रापूर येथून अटक केली असून, कोतवाली पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, शीतल मुगडे, तनवीर शेख, ज्ञानेश्वर मोरे, दीपक रोहकले, तान्हाजी पवार आदीच्या पथकाने ही कारवाई केली.
Web Title: Identified on Instagram, woman was assaulted by being taken to a lodge
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study