संगमनेर घटना: स्मशानभूमीमध्ये इसमाचा मृतदेह, शेजारी कागदावर महिलेचे नाव
Sangamner News: स्मशानभूमीमध्ये एका गुलमोहर झाडाच्या खाली एका 45 वर्षीय इसमाचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याची घटना.
संगमनेर: तालुक्यातील घारगाव येथील स्मशानभूमीमध्ये एका गुलमोहर झाडाच्या खाली एका 45 वर्षीय इसमाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास आढळून आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, घारगाव स्मशानभूमीमध्ये असलेल्या गुलमोहराच्या झाडाखाली एका इसमाचा मृतदेह आढळल्याची खबर सरपंच नितीन आहेर यांना मिळाली. त्यांनी सदर ठिकाणी जावून खात्री केली असता सदर इसम मयत झाल्याचे आढळून आले. याबाबत सरपंच नितीन आहेर यांनी घारगाव पोलीस ठाण्यास खबर दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष खेडकर व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली
पंचनामा करुन श्री. आहेर यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 23/2023 नुसार नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आर. व्ही. खेडकर हे करत आहे. सदर इसमाजवळ आढळलेल्या एका कागदावर अलका असे नाव लिहिलेले आहे.
Web Title: Isma’s dead body in the crematorium, the woman’s name on a piece of paper
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App