Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: डोक्यात दगड घालून एकाची हत्या, पडीक शेतात आढळला मृतदेह

अहमदनगर ब्रेकिंग: डोक्यात दगड घालून एकाची हत्या, पडीक शेतात आढळला मृतदेह

Ahmednagar News:  अज्ञात व्यक्तीने एका तीस वर्षीय व्यक्तीच्या डोक्‍यात दगड घालून निर्घृणपणे खून (Murder) केल्याची घटना.

One was Murder by a stone on the head, the body was found 

पारनेर:  अज्ञात व्यक्तीने एका तीस वर्षीय व्यक्तीच्या डोक्‍यात दगड घालून निर्घृणपणे खून केला आहे. पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (राळेगण फाटा) ते राळेगण सिद्धी रोडवर ही घटना शुक्रवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली आहे. अंकुश भिमाजी कौठाळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अमोल भिमाजी कौठाळे यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शुक्रवार दि 26 रोजी सकाळी 11.00 वा च्या सुमारास मी माझे घरी असताना आमचे गावातील चंद्रकांत राघु कोठावळे याने मला त्याचे मोबाईल फोनवरून कळविले की, आत्ताच थोड्या वेळापुर्वी श्रीकांत कोठावळे याचा मोबाईल फोन आला की, पारनेर फाटा ते राळेगणसिद्धीकडे कॅनलच्या पुढे रोडचे जवळ असलेल्या पडीक शेतात तुझा भाऊ हा जखमी अवस्थेत पडलेला आहे. तेथे लोकांची गर्दी जमलेली आहे.

मी चंद्रकांत कोठावळे यांचे घरी गेलो. तेथून आम्ही पारनेर फाटा ते राळेगणसिद्धीकडे कॅनलच्या पुढे रोडचे जवळ असलेल्या पडीक शेता जवळ आलो. मी व चंद्रकांत कोठावळे तेथे जावून पाहिले असता माझा भाऊ हा मयत स्थितीत पडलेला होता. त्याचे डोक्याचे मागील बाजुस व कपाळावर दगडाने कोणीतरी अनोळखी इसमाने मारहाण करून जखमी केल्याने त्याचे डोक्यातून रक्त येत होते. माझा भाऊ हा जागीच मयत झाल्याचे दिसून आलेले आहे. त्यानंतर मी माझे चुलते आनंदा बाळाजी कोठावळे यांना सदर घटनेची माहिती दिली. ते सुध्दा घटना ठिकाणी आले. त्यांनी ही सदरचे प्रेत हे माझेच भावाचे आहे. असे ओळखले. सदर ठिकाणी जमलेल्या लोकांकडून मला समजले की, माझा भाऊ व त्याचे बरोबर एक इसम सकाळी ८ वा चे सुमारास वरील नमुद घटना ठिकाणी बसलेले होते.

तरी आज दि 26 रोजी सकाळी 8 वा ते 11 चे सुमारास माझा भाऊ अंकुश भिमाजी कोठावळे वय 33 वर्षे रा. सांगवी सुर्या ता. पारनेर यास कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यावर, कपाळावर दगड मारून गंभीर जखमी करून अज्ञात कारणासाठी जीवे ठार मारले आहे. म्हणून माझी अज्ञात इसमाविरुध्द फिर्याद आहे.

सुपा पोलिसांनी अमोल कौठाळे यांच्या फिर्यादी वरुन आज्ञात व्यक्ती विरुध सदोश मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आसुन सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक श्रीमती ज्योती गडकरी पुढील तपास असुन पीएसआय तुळशीराम पवार, पोलिस कर्मचारी खंडेराव शिंदे, आमोल धामने यशवंत ठोबरे आदी पोलिस विविध ठिकाणी तपास करत आहेत.

Web Title: One was Murder by a stone on the head, the body was found 

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here