जामनेर तालुक्यातील शहापूर रस्त्यावर मॅजिक गाडीने (ACCIDENT) झाडाला धडक दिली, त्यामध्ये एकाचा जागीचं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
जळगाव: जामनेर तालुक्यातील शहापूर रस्त्यावर मॅजिक गाडीने झाडाला धडक दिली, त्यामध्ये एका व्यक्तीचा जागीचं मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. जामनेर शहरापासून जवळच शहापूर रस्त्यावर रात्रीच्या सुमारास मॅजिक गाडीने झाडाला धडक दिल्यामुळे आनंदा भीमराव जगताप रा. भारुडखेडा यांचा मृत्यू झाला. दीपक मुरलीधर शेळके रा. भारुडखेडा हा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी व्यक्तीला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. त्याचबरोबर मॅझिक गाडी सुध्दा एका बाजूला केली आहे. आनंदा भीमराव जगताप यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. त्याचबरोबर जखमी रुग्णावरती उपचार सुरु आहेत.
काल दुपारी १२ वीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये मृत्यू झालेल्या आनंदा जगताप यांच्या मुलाने बारावीच्या वर्गात शाळेत पहिला क्रमांक मिळविला आहे. मुलगा पहिला आल्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या वडिलांना मृत्यूने वाटेत गाठले. अपघात झाल्याची माहिती ज्यावेळी गावात पसरली त्यावेळी लोकांनी गावात हळहळ व्यक्त केली. अपघात झाल्याची माहीती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Accident before he reached home, an unfortunate incident happened
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App