जवानाच्या घरावर जमावाचा प्राणघात हल्ला, अहमदनगरमधील भयावह घटना
Ahmednagar News: भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या घरावर गावगुंडांनी प्राणघात हल्ला केल्याची घटना.
अहमदनगर: अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या घरावर गावगुंडांनी प्राणघात हल्ला केल्याची घटना घडली आहे. गावगुंडांनी जवानाला आणि त्याच्या कुटुंबीयांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर तालुक्यातील जेऊर वाघवाडी येथील राजस्थान बिकानेर 66 मधील तोफखाना युनिटवर कार्यरत असलेल्या सैनिक महेश गोरक्ष वाघ यांच्यावर हा हल्ला झाला आहे. गावातील गुंडांनी हल्ला केला असून महेश वाघ हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Web Title: Ahmednagar Mob attack on jawan’s house
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App