मराठ्यांना सरसकट आरक्षण देणं शक्य नाही, गिरीश महाजन यांच्या तोंडून भाजपची भूमिका?
Maratha Reservation: सरकारचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका मांडली.
मुंबई: मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे यांनी दोन वेळा उपोषण केले आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात 24 डिसेंबर अशी डेडलाईन सरकारने दिल्यानंतर अलिकडेच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
दुसरीकडे सरकारचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या तोंडून भाजपची भूमिका मांडली जात आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे ही मागणी असली तरी हे शक्य नाही. राज्यात ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना प्रमाणपत्र वाटप झाले आहे. मनोज जरांगे त्यांची मागणी मांडत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला त्यांना दुखवायचं नाही. ओबीसीचं आरक्षण काढता येणार नाही. मराठ्यांना घाई गडबडीत आरक्षण देऊन त्यांना फसवणूक करायची असं आता होता कामा नये असेही महाजन यांनी म्हटले आहे.
मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नाही. हे मनोज जरांगे यांच्या जवळच्या लोकांना देखील माहीती आहे. समाजातील अभ्यासक, प्राध्यापक, कुलगुरु विचारवत यांनी सर्वांनी विचार करून ठरविले आहे की सरसकट आरक्षण देता येणार नाही. एससीबीसी कोर्टातून मिळेल. त्यातूनच न्याय मिळेल, कोर्टाने आधी मराठ्यांना आरक्षण नाकारले आहे. त्यावर फेरयाचिका केली आहे. त्यातून समाजाला नक्की न्याय मिळेल असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांची ही भूमिका भाजप सरकारची आहे का सवाल येथे निर्माण झाला आहे.
Web Title: Maratha Reservation is not possible to give reservation to Marathas, BJP’s position from the mouth of Girish Mahajan
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App