Home अहमदनगर मुळा धरणात जलसमाधी आंदोलन: आंदोलकांच्या धरणात उड्या

मुळा धरणात जलसमाधी आंदोलन: आंदोलकांच्या धरणात उड्या

Ahmednagar Rahuri: स्वाभिमानीचे मुळा धरणात जलसमाधी आंदोलन (agitation) चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात, अधिकारी निरुत्तर, भरपाई देण्याची मागणी.

Jalasamadhi agitation at Mula Dam Protesters jump into the dam

राहुरी: अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली नसल्याने आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मुळा धरणात उड्या घेतल्या. त्यांना धरणातून बाहेर काढताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. आंदोलनाचा इशारा दिल्याने आधीच तैनात असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने त्यांना पाण्याबाहेर काढल्याने आंदोलनातील अनर्थ टळला.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये देण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे व निधी उपलब्ध झाल्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन शासकीय अधिकारी देत आहेत. शेतकऱ्यांना भरपाई कधी देणार? यावर अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुळा धरणात उड्या घेतला. घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. धरणात उड्या मारलेल्या आंदोलकांना पोलिस व आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकडीने पाण्याबाहेर काढून ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टाळला.

स्वाभिमानीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी केली होती. शासनास दिलेली मुदत संपल्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुळा धरणात जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनास उद्धव ठाकरे शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी पाठिंबा देऊन आंदोलनात भाग घेतला.

आंदोलनस्थळी भाषण असताना प्रांताधिकारी अनिल पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निधी उपलब्ध होताच शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आश्वासन दिले. शासनाने नुकसान भरपाईसाठी किती तरतूद केली आहे, असे विचारताच अधिकारी गप्प झाले. यामुळे संतापलेल्या कार्यकत्यांनी मदत कधी देणार? घोषणा देत दहा-पंधरा कार्यकर्ते जलसमाधी घेण्यासाठी घेतले. धरणाकडे धावले. स्वाभिमानीचे हमिद पटेल, विशाल तारडे, मीनानाथ पाचारणे, विठ्ठल सूर्यवंशी आदींनी मुळा धरणाच्या पाण्यात उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. उड्या घेतलेल्या आंदोलकांना पोलिस व आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकडीने पाण्यातून बाहेर काढत ताब्यात घेण्यात आले.

मुळा धरणावर पोलिसांचा मोठ फौजफाटा, अग्निशामक रुग्णवाहिका पाण्यात चालणाऱ्या बोटी, पट्टीचे पोहणारे युवक आदींसह पोलिस बंदोबस्त होता.

या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राहुरी पोलिसांनी ठाकरे शिवसेनेसह स्वाभिमानीचे रवींद्र बापूसाहेब मोरे (रा. टाकळीमियाँ), रावसाहेब रामदास खेवरे (रा. देसवंडी), भागवत निमसे (रा. देवळाली), राहुल चोथे, अब्दुल हमीद राज महंमद पटेल व सुभाष चोथे (तिघे रा. टाकळीमियाँ), विजय शिरसाठ (रा. राहुरी बु.), प्रशांत शिंदे (रा. ब्राह्मणी), विशाल तारडे (रा. केंदळ), कैलास शेळके (रा. राहुरी खु.), सुनील शेलार (रा. तांभेरे), मीनानाथ पाचरणे (रा. रामपूरवाडी), विठ्ठल सूर्यवंशी (रा. मुसळवाडी), आदी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Jalasamadhi agitation at Mula Dam Protesters jump into the dam

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here