Home अकोले Nilwande Dam: निळवंडेतून रब्बीचे पहिले आवर्तन सोडले

Nilwande Dam: निळवंडेतून रब्बीचे पहिले आवर्तन सोडले

Akole Nilwande Dam:  निळवंडेतून १ हजार ३०० क्युसेक वेगाने आवर्तनाचे पाणी प्रवरा नदीपात्रातून लाभक्षेत्राकडे झेपावले.

Rabbi's first revision was released from the Nilwande Dam

अकोले : भंडारदरा धरण लाभक्षेत्रासाठी निळवंडे धरणातून यंदाचे रब्बीचे पहिले आवर्तन बुधवारी सायंकाळी सुरू झाले असून, बरोबर साडेसहाच्या ठोक्याला निळवंडेतून १ हजार ३०० क्युसेक वेगाने आवर्तनाचे पाणी प्रवरा नदीपात्रातून लाभक्षेत्राकडे झेपावले आहे.

भंडारदरा-निळवंडे धरणाच्या पाणलोटात व लाभक्षेत्रात यंदा बक्कळ पाऊस झाला असून, पाण्याची फार मागणी नाही. रब्बी सिंचन व पिण्याच्या पाण्याची आवर्तने होऊन पाणी शिल्लक राहण्याची शक्यता आहे. बुधवारी रब्बी हंगाम सिंचन पहिले आवर्तन सोडण्यात आले. सांडव्याच्या वक्राकार ‘स्पिलवे गेटमधून ६०० क्यूसेक व विद्युत गृह विमोचकातून ७०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे सिंचन आवर्तन आदमासे वीस-पंचवीस दिवस चालेल व साधारण दोन टीएमसी पाणी खर्च होईल, असे जलसंपदाचे सहायक अभियंता अभिजित देशमुख यांनी  सांगितले.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Rabbi’s first revision was released from the Nilwande Dam

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here