Home अहमदनगर Crime: महिला सावकार: २० हजाराचे मागते ७ लाख रुपये

Crime: महिला सावकार: २० हजाराचे मागते ७ लाख रुपये

Jamkhed Crime Women Lender Asks for Rs. 20,000, Rs. 7 lakhs

जामखेड | | Jamkhed: जिल्ह्यात सावकारकीचे फोल चांगलेच वाढत आहे. महिला देखील यामध्ये कमी पडताना दिसून येत नाही.  एका महिलेने व्याजाने घेतलेले पैसे परत देऊनही 20 हजारांचे सात लाख व्याज मागत जीवे मारण्याची धमकी देत एका व्यक्तीसह येऊन समुद्रे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी महिला खाजगी सावकाराविरूध्द जामखेड पोलिसांत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

मंगल मोरे (रा. जामखेेड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित सावकार महिलेचे नाव आहे.  याबाबत  चित्रा विश्वनाथ समुद्रे ( रा. नागेश शाळेजवळ, जामखेड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार समुद्रे या मोलमजुरी चे काम करतात. त्यांच्या घरगुती अडचणींमुळे त्यांनी संशयित मोरे यांच्याकडून व्याजाने 20 हजारांची रक्कम 23 फेब्रुवारी 2020 रोजी घेतली होती. 27 नोव्हेंबर 2020 रोजी समुद्रे यांनी व्याजासह ती रक्कम परत केली.

मात्र खाजगी सावकार असलेल्या मंगल मोरे या महिलेने सदर पैशाचे व्याजासह सात लाख रुपये व्याज झाले असून ते देण्याचा तगादा लावला. तसेच 27 डिसेंबर रोजी महिला घरात काम करत असताना मोरे या महिलेने एका व्यक्तीसह येऊन समुद्रे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. समुद्रे यांनी जामखेड पोलिसांत धाव घेत त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावरून मोरे यांच्यावर सावकारी अधिनियम तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास  पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड करत आहेत.

Web Title: Jamkhed Crime Women Lender Asks for Rs. 20,000, Rs. 7 lakhs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here