Home Ahmednagar Live News देशात सर्वांचे आकर्षण,  देशातील सर्वात उंच ध्वज फडकला

देशात सर्वांचे आकर्षण,  देशातील सर्वात उंच ध्वज फडकला

Karjat country's highest flag was flown

कर्जत | Karjat: कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतून देशातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज शिवपट्टण किल्ल्यावर  डौलाने फडकला आहे. विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना आज विजयादशमीच्या मुहूर्तावर लाखोंच्या उपस्थितीत साधु संत व महंताच्या साक्षीने मोठ्या उत्साहात झाली.

हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ रोजी झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६X६४ फूट आहे. ध्वज स्तंभाचे वजन १८ टन असून नुसत्या ध्वजाचे वजन ९० किलो आहे. साडे पंचावन्न हजार चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरला आहे. ध्वज प्रतिष्ठापना आणि ध्वजारोहणाच्या निमित्ताने या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली होती.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS

वेगवेगळ्या संस्थानचे उत्तराधिकारी संत महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. आखील भारतीय वारकरी संघटनेचे अध्यक्ष हभप प्रकाश महाजन बोधले, शिक्षण क्षेत्रातील तंज्ञ डिजिटल शिक्षक डिसले गुरूजी, राहिबाई पोफळे, मंगलाताई बनसोडे, अनुराधा गोरे, अवधूत गांधी सह मोठ्या संख्येने विद्यमान आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Karjat country’s highest flag was flown

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here