Home कर्जत सराफाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले ६० लाखाला

सराफाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले ६० लाखाला

Karjat Sarafa was robbed of Rs 60 lakh at gunpoint

कर्जत | Karjat: जिल्ह्यामध्ये लुटीचे प्रकार चांगलेच वाढीस लागलेले दिसून येत आहे. जिल्ह्यात दररोज कोठेतरी लुट झाल्याचे समोर येत आहे. असाच प्रकार रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान सराफ व्यवसायिकाला अडवून साठ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.

अहमदनगर सोलापूर राष्ट्रीय मार्गावर माहिजळगाव शिवारातील कवटीचा लावण येथे सराफ व्यावसायिकाला अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने लंपास केले.

सराफ व्यावसायिक अतुल चंद्रकांत पंडित व त्यांचा भाऊ राहुल पंडित हे माहीजळगाव येथील दुकान बंद करून आपल्या गाडीतून नगर सोलापूर रस्त्याने मिरजगावाकडे जात असताना कवटीचे लवण येथे तीन मोटारसायकल आल्या. या आलेल्या सहा चोरट्यांनी पंडित यांची गाडी अडवली. या गाडीवर दगडफेक केली. पिस्तुलाचा धाक दाखवत गाडीचे दार उघडले. त्यांच्याकडील पिशवी हिसकावून घेतली. या पिशवीत १० लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने व ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असे ६० लाख रुपये किमतीचे दागिने चोरून तेथून पोबारा केला. कर्जतचे पोलीस अधिकारी या आरोपींचा शोध घेत आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Karjat Sarafa was robbed of Rs 60 lakh at gunpoint

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here