Home अहमदनगर लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावून धाडसी घरफोडी

लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावून धाडसी घरफोडी

Ahmednagar Brave burglary by stabbing a child in the neck

अहमदनगर | Ahmednagar: नगर शहरातील केडगाव येथील मराठा नगर भागात अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत घरातील सोन्याचे दागिने एक लाख रुपये असा ऐवज चोरून नेला. शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शैलेश भाऊलाल ठाकूर रा. मराठा नगर केडगाव हे त्यांच्या कुटुंबीयांसह घरी झोपलेले असताना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्याचा भाऊ देवील याने दरवाजा वाजवून त्यांना उठविले.

शैलेश यांनी दरवाजा उघडला असता समोर भाऊ भावजय व चार अनोळखी व्यक्ती उभे होते. त्यातील एकाने देवील यांचा पाच वर्षाच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावलेला होता. आरडाओरडा करू नकोस नाहीतर कापून टाकीन अशी धमकी देऊन बेडरूम मध्ये घुसून कपाटात उचकापाचक करत कपाटातील सोन्याचे दागिने व एक लाख रुपये रोख असे एकूण एक लाख ६६ हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला. अशी फिर्याद शैलेश ठाकूर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar Brave burglary by stabbing a child in the neck

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here