Home पारनेर गाडीची काच फोडून दोन लाख रुपये लंपास

गाडीची काच फोडून दोन लाख रुपये लंपास

Parner Two lakh rupees by breaking the glass of the car

पारनेर | Parner: एका बेवड्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मनात राग ठेऊन चक्क गाडीची काच फोडून गाडीतील २ लाख रुपयांची रक्कम फोडल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी फिर्यादी गाडीमालक सतीश कारखेले यांनी पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद केली आहे. सदर घटना एक नोव्हेंबर रोजी राळेगण थेपाळ येथे घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अण्णा किसन कारखिले रा. राळेगण थेरपाळ यास ३१ ऑक्टोबरला सतीश कारखेले यांनी दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही याबद्धल मनात राग धरून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याच्या कारचे नुकसान करत मागील काच फोडली. त्यानंतर गाडीमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये, कागदपत्रे चोरून नेली. असे फिर्यादीत म्हंटले आहे.  

याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे हे करीत आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Parner Two lakh rupees by breaking the glass of the car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here