Home अहमदनगर तलाठी कार्यालयातील एकास लाच घेताना अटकेत

तलाठी कार्यालयातील एकास लाच घेताना अटकेत

Karjat Talathi office assistant arrested for taking bribe

कर्जत | karjat: शेतीचे वाटणीपत्र करून त्या आधारे फेरफार नोंद करण्यासाठी घुमरी कोकणगाव येथील तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला १ हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

सचिन सुरेश क्षीरसागर वय ३५ रा. मिरजगाव असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

तक्रारदाराच्या शेतीचे वाटणीपत्र करून त्या आधारे फेरफार नोंद करण्यासाठी घुमरी कोकणगाव येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला त्या कामासाठी तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या सचिन क्षीरसागर याने १ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. आरोपी क्षीरसागर याने पंचासमक्ष एक हजार रुपयांची मागणी केली. १८ मार्च रोजी तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारली. त्याचवेळेस पथकाने त्यास अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक शाम पवरे  यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Karjat Talathi office assistant arrested for taking bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here