Home राष्ट्रीय केरळ पुरात आतापर्यंत 167 जणांचा मृत्यू, 8 हजार कोटींचे नुकसान

केरळ पुरात आतापर्यंत 167 जणांचा मृत्यू, 8 हजार कोटींचे नुकसान

केरळ पुरात आतापर्यंत 167 जणांचा मृत्यू, 8 हजार कोटींचे नुकसान

तिरुअनंतपुरम– केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन मोडीत काढल आहे.  सध्याच्या स्थितीला 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे.  केरळमधल्या पुरामुळे आतापर्यंत 167 जणांचा बळी घेतला आहे. केरळमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहता एनडीआरएफच्या पाच टीम तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच एनडीआरएफची आणखी जवान केरळमध्ये दाखल होणार आहेत. 

You May Also LikeShraddha Kapoor Upcoming Movies 

केरळमधल्या पथनमतित्ता जिल्ह्यातील रन्नी, अरनमुला, कोझेनचेरी गावांतील लोक मुसळधार पावसामुळे घरातच अडकून पडली आहेत. पथनमतित्ता, एर्नाकुलम आणि थरिस्सूर जिल्ह्यांतील अनेक भागात पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक आहे. गल्लीबोळाला नद्यांचं स्वरूप आलं आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे मदतीची मागणी केली आहे.

websites

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here