Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: वसतीगृहातील मुलीला पळवून नेऊन अत्याचार, तरुणास अटक

अहमदनगर ब्रेकिंग: वसतीगृहातील मुलीला पळवून नेऊन अत्याचार, तरुणास अटक

 Ahmednagar Crime:  वसतिगृहात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार (abused) केल्याची घटना.

Kidnapped girl from hostel and abused, youth arrested

अहमदनगर:  येथील अदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. तिला पळवून नेऊन अत्याचार करणार्‍या तरूणाला तोफखाना पोलिसांनी लोणावळा (जि. पुणे) येथून ताब्यात घेत अटक केली असून पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. विश्वनाथ गडदे (वय 32 रा. गडदे आखाडा, राहुरी) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

येथील अदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात 84 मुली राहतात. राहुरी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी या वसतिगृहात राहत होती. ती शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेत होती. 2 फेब्रुवारीला दुपारी ती विद्यालयात क्लाससाठी जाते म्हणून वसतिगृहातून बाहेर पडली. ती सायंकाळपर्यंत घरी आली नाही. याप्रकरणी वसतिगृहाचे काम पाहणार्‍या महिलेने 3 फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Business Idea | फक्त १ हजार रुपयांमध्ये घर बसल्या सुरु करा बिजनेस होईल डबल फायदा | Earn Money

दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जे.सी. मुजावर हे करीत आहेत. त्यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप बडे यांनी पीडित मुलीला पळवून नेणार्‍या गिडदे याचे लोकेशन काढून त्याला लोणावळा येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याविरूध्द अत्याचाराचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Kidnapped girl from hostel and abused, youth arrested

Also See: Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here