Home पुणे कार विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू

कार विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू

Accidental Death: तरुणाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून गाडीसह बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू.

young man death after his car fell into a well on the road

पुणे : अण्णापूर-शिरूर रस्त्यावर कार विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिरूर – अण्णापूर रस्त्यावरील अण्णापूर येथे राहुल गोपीनाथ पठाडे (रा. आसेगाव रस्ता, शेवगाव, जि. नगर) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

राहुल गोपीनाथ पठाडे हा पांढऱ्या रंगाची गाडी (एमएच-१६ एटी-१६६२ ) चालवत होता. दरम्यान, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून गाडीसह बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Business Idea | फक्त १ हजार रुपयांमध्ये घर बसल्या सुरु करा बिजनेस होईल डबल फायदा | Earn Money

घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, चालक सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमाने यांनी धाव घेत परिसरातील नागरिकांच्या मदतीने गाडीसह त्याला बाहेर काढले. परंतु उशिरा मदत मिळाल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्यानुसार, हा युवक शिरुरकडून मलठणकडे आपल्या गाडीसह जात असताना तो पुन्हा येवले माथा येथून मागे वळून पुन्हा शिरूरकडे जात होता. यादरम्यान उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी रस्ता सोडून पंधरा फूट लांब असणाऱ्या कठडा नसलेल्या विहिरीत गेली.

Web Title: young man death after his car fell into a well on the road

Also See: Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here