Home अहमदनगर पुण्यानंतर आता नगरमध्ये देखील कोयता गँगची दहशत, कोयते नाचवत दुकानाची तोडफोड

पुण्यानंतर आता नगरमध्ये देखील कोयता गँगची दहशत, कोयते नाचवत दुकानाची तोडफोड

Ahmednagar Crime News:  सुपा येथील पान दुकानावर कोयते नाचवत पान दुकानाची तोडफोड केल्याची घटना, दोघांना मारहाण.  (Koyta Gang )

After Pune, Koyta Gang terror in Ahmednagar

अहमदनगर : सुपा येथील पान दुकानावर कैफ मन्यार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोयते नाचवत पान दुकानाची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. एकाला मारहाण करत जखमी केलं आहे. या सर्व घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पुण्यानंतर आता नगरमध्ये देखील कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे.

समीर जब्बार सय्यद (रा. सुपा) यांनी सुपा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अहमदनगर-पुणे महामार्गावर दरवेश हॉटेल जवळील हिरा मोती पान दुकानाजवळ काही तरुण थांबले होते. त्यानंतर ते तेथे जवळच लघु शंका करु लागले. तेव्हा पान दुकानावरील समीर सय्यद यांनी त्यांना “तुम्ही येथे लघुशंका करु नका तेथे समाज मंदीर आहे” असं म्हणाले. तेव्हा तेथे प्रवासी युवक व स्थानिक युवक याच्यांत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी ते प्रवासी युवक शिवीगाळ करत पुण्याच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर थोड्याच वेळात पुणे जिल्ह्यातील गुन्हेगार कैफ मन्यार हा आपल्या सहकाऱ्यांसह तेथे आला.

तेव्हा त्याच्याजवळ कोयता लाकडी दांडके होते. तिथे आल्यानंतर त्यांनी पान दुकानात तोडफोड केली आणि दुकानातील समीर सय्यद व साजित शेख यांना मारलं. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी साजित शेख यास स्थानिकाच्या मदतीने जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

Business Idea | फक्त १ हजार रुपयांमध्ये घर बसल्या सुरु करा बिजनेस होईल डबल फायदा | Earn Money

सुपा पोलिसांनी आपला ताफा तात्काळ पुण्याच्या दिशेने वळवला आणि या घटनेतील मुख्य आरोपी कैफ मन्यार याला रांजणगाव गणपती येथे अटक केली. त्यास सुपा पोलिस स्टेशनला हजर केले. कैफ मन्यार याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: After Pune, Koyta Gang terror in Ahmednagar Supa

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here