Home अहमदनगर ऊसाने भरलेल्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने अपघात, महिला ठार

ऊसाने भरलेल्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने अपघात, महिला ठार

Ahmednagar Accident News:  ऊसाने भरलेल्या भरधाव ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघाताची घटना. या अपघातात महिला ठार झाली आहे.

Sugarcane truck hits motorcycle, woman killed in an accident

नेवासा | Nevasa: ऊसाने भरलेल्या भरधाव ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघाताची घटना सोमवारी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास नेवासा तालुक्यातील नेवासाफाटा  ते भानसहिवरा रस्त्यावर घडली. या अपघातात देडगाव येथील महिला ठार झाली आहे.

याबाबत सखाहारी पांडुरंग मुंगसे (वय 60) धंदा शेती रा. देडगाव ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी पत्नी लंकाबाई सखाहरी मुंगसे हिस नेवासाफाटा येथील हॉस्पीटलमध्ये माझी वैद्यकीय उपचारासाठी माझे कडील बजाज सीटी 100 मोटारसायकल (एमएच 17 बीके 1614) वरुन घेवून आलो होतो.

तेथे औषधोपचारानंतर दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास मी व पत्नी वरील मोटार सायकलवरुन नेवासा फाटा ते भानसहिवरा रोडने घराकडे जात असताना हंडिनिमगाव शिवारातील सावता सर्व्हिस सेंटरच्यापुढे जात असताना आमच्या पाठीमागून भरधाव येणार्‍या ऊसाने भरलेल्या ट्रकने (एमएच 43 ई 2421) आम्हास पाठीमागून जोराची धडक  दिल्याने अपघात होवून मी मोटारसायकलसह रोडच्या डाव्या बाजूला पडलो तर पत्नी लंकाबाई ही रोडवर पडल्याने ट्रकचे चाक तिचे पोटावरुन गेल्याने ती जागेवरच मृत्यूमुखी  झाली.

Business Idea | फक्त १ हजार रुपयांमध्ये घर बसल्या सुरु करा बिजनेस होईल डबल फायदा | Earn Money

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी  ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 175/2023 भारतीय दंड विधान कलम 304 (अ), 279, 337, 338, 427 सह मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sugarcane truck hits motorcycle, woman killed in an accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here