Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: महाविद्यालयीन तरुणीसह दोन मुलींचे अपहरण

अहमदनगर ब्रेकिंग: महाविद्यालयीन तरुणीसह दोन मुलींचे अपहरण

Breaking News | Crime | Ahmednagar: दोन मुली दोन अज्ञात तरुणाने अपहरण केल्याच्या घटना.

Kidnapping of two girls including a college girl

राहुरी: राहुरी तालुक्यातील दोन मुली दोन अज्ञात तरुणाने अपहरण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 राहुरी शहरातील एका महाविद्यालयात १२ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेली तरुणी अभ्यास करण्यासाठी मैत्रीणीच्या घरी जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली. या दरम्यान त्या महाविद्यालयीन तरुणीचे अज्ञात तरुणाने अपहरण करून पळवून नेल्याची घटना दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी राहुरी शहर हद्दीत घडली आहे.

या घटनेतील १६ वर्षे ७ महिने वय असलेली पिडीत तरुणी ही राहुरी नगरपरिषद हद्दीत तीच्या कुटुंबासह राहत असून ती शहरातील एका महाविद्यालयात १२ वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे. काल दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान ती तरुणी नेहमीप्रमाणे शहरातील तिच्या मैत्रिणीकडे अभ्यास करण्यासाठी जाते. असे सांगून तिची स्कूल बॅग घेऊन ती घरातून बाहेर गेली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ती घरी परत आली नाही. तेव्हा त्या तरुणीच्या वडिलांनी तीच्या मैत्रीणीला फोन करून चौकशी केली असता ती दुपारी ३.३० वाजताच गेल्याचे सांगितले. तरुणीच्या नातेवाईकांनी सदर तरुणीचा परीसरात शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात तरुणीने तिचे अपहरण करून पळवून नेल्याची तीच्या नातेवाईकांची खात्री झाली. त्यानंतर नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातच्या विरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पीडित तरुणीच्या घरी व आसपास चौकशी करून घटनेची माहिती घेतली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गिते करीत आहेत.

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात सुतारकाम करणाऱ्यासाठी आलेल्या तरुणाने १० वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत विक्रम ओहोळ या तरुणावर संशयित आरोपी म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील आरोपी विक्रम बाळासाहेब ओहोळ हा तरुण राहुरी तालुक्यातील गुहा येथे राहतो. आरोपी विक्रम हा काम करत असताना समोरील घरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला हातवारे व इशारे करत असे. सदर बाब त्या मुलीच्या वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चुलत्याकडे जाऊन त्यांच्या कामावरील विक्रम ओहोळ याची तक्रार केली. तेव्हा ते म्हणाले की, तो माझा पुतण्या आहे. मी त्याची माझ्या पद्धतीने समजूत घालतो व शिक्षा करतो. तुम्ही त्याला काही बोलू नका. असे सांगितल्याने सदर वाद त्या वेळेस मिटला होता. त्यानंतर पीडित मुलगी शाळेत गेली. ती उशीरापर्यंत घरी परत आली नाही. तिच्या नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला. मात्र ती मिळुन आली नाही. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी विक्रम ओहळ या तरुणाच्या गुहा येथील घरी जाऊन चौकशी केली. मात्र तोदेखील बेपत्ता होता. त्यानेच आपल्या मुलीला पळवून नेल्याची खात्री झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीवरून आरोपी विक्रम बाळासाहेब ओहोळ रा. गुहा याच्यावर भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: Kidnapping of two girls including a college girl

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here