Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग! एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या

अहमदनगर ब्रेकिंग! एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या

Breaking News | Ahmednagar Crime: एकतर्फी प्रेमातून  तरुणाने अल्पवयीन युवतीवर धारदार चाकूने हल्ला करून निघृणपणे खून केल्याची घटना.

Killing a young woman due to one sided love

कर्जत: एकतर्फी प्रेमातून कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथे एका तरुणाने अल्पवयीन युवतीवर धारदार चाकूने हल्ला करून निघृणपणे खून केला. यानंतर त्याने स्वतःवरही चाकूने हल्ला करून घेतल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजता घडली. दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.

प्रतीक लक्ष्मण काळे (वय-२२, रा. राक्षसवाडी बुद्रुक, ता. कर्जत) असे हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. तर श्रावणी मोहन पाटोळे (१८, म्हसेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावणीचे आजोळ असलेल्या राक्षसवाडी बुद्रुक येथे श्रावणी राहून कर्जत येथे बारावीच्या वर्गात शिकत होती. प्रतीक काळे याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. बारावीचा सराव पेपर दिल्यानंतर ती मैत्रिणीच्या समवेत तिच्या गाडीवर बसून राक्षसवाडीला आली. घरी प्रतीक काळे याने तिला अडवले व मी तुझ्यावर प्रेम करतो, परंतु तू का मला प्रतिसाद देत नाही, अशी विचारणा केली. विनाकारण मला त्रास देऊ नको, अन्यथा मी मामाला तुझे नाव सांगेल, असे श्रावणी म्हणताच प्रतीक यास राग आला व त्याने सोबत आणलेला धारदार चाकूने श्रावणीच्या पोटामध्ये वार केला. हा वार एवढा जोरात होता की चाकू श्रावणीच्या पोटातून आरपार गेला आणि ती तिथेच खाली कोसळली. यावेळी झटापट देखील झाली श्रावणी जोरजोरात ओरडली. शेजारच्या वस्तीवर आवाज ऐकू गेल्यानंतर आसपासचे लोक धावत आले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रावणीला पाहिले. यावेळी प्रतीक काळे याने त्याच चाकूने स्वतःच्या पोटावरही वार करून घेतले. दरम्यान रुग्णालयात नेण्यापूर्वीच श्रावणीचा मृत्यू झाला होता. जखमी झालेल्या प्रतिक यास नगर येथे उपचारासाठी देण्यात आले आहे.

याप्रकरणी घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी भेट दिली आहे. रात्री उशिरापर्यंत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Killing a young woman due to one sided love

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here