Home अकोले अकोले: पतंगाच्या मागे धावला अन घात झाला

अकोले: पतंगाच्या मागे धावला अन घात झाला

Breaking News | Akole: पाच वर्षीय मुलगा पतंगाच्या मागे धावत सुटला अन अडगळीतील ७० फूट खोल आडात पडून मृत्यू झाल्याची घटना.

ran after the kite and was ambushed

अकोले : पतंगाने चिमुकल्याचा बळी गेल्याची घटना अकोले शहरात समोर आली आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील अगस्ती थिएटर गल्ली येथून सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रुद्र आकाश पवार हा पाच वर्षीय मुलगा गायब झाला होता. नातेवाईक, अकोलेकर व पोलिसांनी शहर पिंजून काढत त्याचा शोध घेतला. मात्र दुर्दैवाने त्याचा मृतदेह चिरेबंदी परिसरात एका अडगळीतील ७० फूट खोल आडात आढळून आला.

सोमवारी दुपारी जेवण झाल्यानंतर रुद्र खेळायला घराबाहेर पडला होता. शहरात संक्रांतनिमित्त पतंग उडवण्याची धूम सुरू होती. कटलेल्या पतंग गोळा करण्यासाठी बच्चेकंपनी धावपळीत होती. चिमुकला रुद्र हा या मुलांसोबत होता. घरी लवकर न आल्याने रुद्रची शोधाशोध सुरू झाली.

शोधाशोध केल्यानंतर उशिरापर्यंत रुद्रचा मागमूस लागला नाही. शोधाशोध करताना चिरेबंदी वाडा येथील एका ७० फूट आडात एका मुलाचा मृतदेह दिसून आला. हा मृतदेह रुद्रचाच असल्याची खात्री पटली. हा मृतदेह पाहताच त्याची आई आणि वडिलांनी टाहो फोडला. कटलेल्या पतंगाच्या मागे धावताना रुद्र आडात पडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. पतंगाने चिमुकल्याचा बळी घेतल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

काही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर घटनेचा उलगडा झाला. रात्री अकरानंतर एका मुलाचा मृतदेह आडात दिसला. तोच मृतदेह रुद्रचा असल्याचे समजले आणि एकच आक्रोश झाला.

Web Title: ran after the kite and was ambushed

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here