Home अहमदनगर अहमदनगर: डोक्याला पिस्टल लावून दोन तरुणांचे अपहरण, १५ लाख लुटले

अहमदनगर: डोक्याला पिस्टल लावून दोन तरुणांचे अपहरण, १५ लाख लुटले

Breaking News | Ahmednagar: गाडीला कट का मारला, असे म्हणत अपहरण करत डोक्याला पिस्टल लावून दोन तरुणांकडून १५ लाख रुपये लटून नेले.

Kidnapping of two youths with a pistol to their heads, 15 lakhs looted

पाथर्डी: विना नंबरच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या चार जणांनी गाडीला कट का मारला, असे म्हणत अपहरण करत डोक्याला पिस्टल लावून दोन तरुणांकडून १५ लाख रुपये लटून नेले. सुमारे पावणेतीन तास हे अपहरण नाट्य चालू होते. ही घटना रविवार, (दि.१७) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अमरापूर तिसगाव रोडवर तिसगाव शिवारात घडली. मुकुंद धस, असे पैसे लुटलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अनिरुद्ध मुकुंद धस (रा. एरंडगाव, ता. फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अनिरुद्ध मुकुंद धस यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व माझा मित्र वैष्णव शिंदे फॉच्युनर गाडीतून शेवगाववरून पुणे येथे स्वॉफ्टवेअर घेण्यासाठी जात होतो. अमरापूर-तिसगाव रस्त्यावर केशर हॉटेलसमोर विना नंबरची स्विप्ट गाडी आमच्या गाडीला गाडी आडवी लावली. चारजण गाडीतून उतरले, त्यांनी घस व शिंदे यांना बळजबरीने मारहाण करीत त्यांच्या गाडीत बसविले. गाडी कासारपिंळगाव व जवखेडे रस्त्याने नेली, तेथे डोक्याला पिस्टल लावून तू शेअर मार्केट चालवितो, आम्हाला साठ लाख रुपये दे, नाहीतर तूला जीवे मारू अशी धमकी दिली. मी व मित्र घाबरलो. मी माझ्या मोबाईलवरुन माझा मित्र ओम वाकळे यास फोनवरुन मला पंधरा लाख रुपये घेऊन तिसगावला ये, असे सांगितले. त्यानंतर माझा फोन बंद करून ठेवला. मला गाडीतून वृद्धेश्वर डोंगरात नेले. तेथून खरवंडीकडे नेले. माझे मित्र ओम वाकळे व तुम्ही खरवंडी येथे भगवानगड फाट्यावर, या असे सांगितले. तेथे एक जण मोटारसायकवरून आला, पैशाची पिशवी घेऊन तो मिडसांगवीकडे पसार झाला. गाडीतून त्या लोकांनी आम्हाला खाली उतरविले. मग मी ओम काळे याला फोन करून बोलावून घेतले व अमरापूरजवळ माझ्या गाडीकडे गेलो. तेथून पोलिसांत येऊन फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पाथर्डी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पाच जण या गुन्ह्यात सहभागी झाले होते. सपोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Kidnapping of two youths with a pistol to their heads, 15 lakhs looted

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here