Home नागपूर फेसबुक फ्रेंडकडून नोकरीच्या मुलाखतीच्या बहाण्याने अत्याचार | Crime News

फेसबुक फ्रेंडकडून नोकरीच्या मुलाखतीच्या बहाण्याने अत्याचार | Crime News

Breaking News | Nagpur Crime: फेसबुक फ्रेंडने नोकरीच्या मुलाखतीच्या बहाण्याने हिल स्टेशनला नेऊन एका महिलेवर अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना.

abused by a Facebook friend on the pretext of a job interview

नागपूर : फेसबुक फ्रेंडने नोकरीच्या मुलाखतीच्या बहाण्याने हिल स्टेशनला नेऊन एका महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  हुडकेश्वर पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल श्यामराव गजबे (३०, गिट्टीखदान) असे आरोपीचे नाव आहे. त्याची फेसबुकवर हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेशी ओळख झाली.

महिला नोकरीच्या शोधात होती. त्याने तिला नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले व मुलाखतीसाठी औरंगाबाद येथे बोलविले. तेथून तो तिला लोणावळा येथे फिरायला घेऊन गेला. तेथे त्याने शीतपेयामध्ये नशेचे पदार्थ टाकून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले व वारंवार अत्याचार केला.

ती लग्नासाठी विचारणा करायची तेव्हा तो टाळाटाळ करायचा. काही दिवसांअगोदर तिने त्याला परत विचारणा केली असता त्याने थेट नकार दिला. तिने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी कुणालविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

Web Title: abused by a Facebook friend on the pretext of a job interview

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here