15 फुट खड्ड्यात पडलेल्या चिमुरडीचा जीव वाचविण्यात प्रशासनाला यश
कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव शहरातील मोहिनीराज नगर भागात मंगळवारी सकाळी इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. दीड ते दोन तास शर्थीचे प्रयत्न करून चिमुकलीला बाहेर काढण्यात आले आहे. प्रथोमपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. ईश्वरी संतोष गंगावणे असे या मुलीचे नाव आहे. तिची प्रकृती स्थिर आहे.
ईश्वरी ही चार वर्षीय चिमुकली मंगळवारी ९ नोव्हेंबरला सकाळी काम सुरु असलेल्या इमारतीजवळ खेळत होती. खेळता खेळता ती इमारतीसाठी खोदलेल्या १५ फुट खोल खड्ड्यात पडली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने प्रशासनास कळविले. नगरपालिकेचे अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी जेसीबी मशीन बोलावून ईश्वरी पडलेल्या खड्ड्याच्या समांतर खड्डा खोडून त्याला बोगदा पाडून चिमुरड्या ईश्वरीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. तिला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Web Title: Kopargaon administration succeeded in saving the life of Chimurdi who fell