Home Suicide News Suicide: नैराश्येतून शेतकऱ्याची आत्महत्या

Suicide: नैराश्येतून शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer commits suicide due to depression

श्रीरामपूर | Suicide: अतिवृष्टीने दोन महिने शेतात पाणी साचून पिक नष्ट झाल्याने आलेल्या नैराश्येतून उंदीरगाव येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत तलाठ्यांनी अहवाल तयार करून तहसीलदारांना पाठविला आहे.

नवनाथ रामदास आसने असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सलग दुसऱ्या वर्षी अतिवृष्टीने खरीप पिके वाया गेल्याने शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे. ही घटना ३१ जुलै रोजी घडली. आसने याने विषारी औषध घेऊन आपले जीवन संपविले. त्याच्यावर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र अखेर त्याची प्राणज्योत मालवली.

मयत आसने हे कष्टाळू शेतकरी होते. त्यांच्याकडे ७ एकर शेतजमीन होती. एकत्रित कुटुंब असल्याने त्याच्यावर मोठी जबाबदारी होती. त्याच्याकडे स्वतः ची बैल जोडी होती. स्वतः ची शेती कसत असताना गावातील इतर शेतकऱ्यांकडे बैलाची जोडीने शेतीची मशागत करत होते.

गावातील माळेवाडी रस्त्यालगत आसने यांची शेती होती. रस्त्यालगत बाजूच्या गटारी हद्दपार झाल्यामुळे अतिवृष्टीचे पाणी सर्व शेतात साचत होते. पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही सोय नव्हती. त्यामुळे दोन महिने हे पाणी शेतात राहून संपूर्ण खरीप हंगाम नष्ट झाला. सलग दुसऱ्या वर्षी हा प्रकार घडला. आसने यांची सुमारे तीन एकर सोयाबीन व कपाशी पूर्णपणे वाया गेली. मागील वर्षी पंचनामे झाले मात्र कोणतीही भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नैराश्येतून आसने यांनी जीवन संपविल्याची माहिती स्थानिक शेतकरी यांनी दिली.   

Web Title: Farmer commits suicide due to depression

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here