लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, मुलाचा बाप देखील झाला पण लग्न अमान्य
श्रीरामपूर | Rape Case: श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर परिसरातील शेतामध्ये काम करणाऱ्या विवाहित तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे, याप्रकरणी पिडीत तरुणीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नानासाहेब राउत असे आरोपीचे नाव आहे. त्याने लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार केला. पिडीत तरुणीने एका मुलाला जन्म दिला. मुलाचा बाप म्हणून देखील नाव लावण्यात आले. मात्र तरीही लग्नाला नकार देण्यात आला. तिला राहण्यासाठी भाडोत्री खोली घेऊन देण्यात आली. बायको म्हणून नांदवले नाही. मात्र लग्नाची मागणी करताच आपल्याला व मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपी नानासाहेब राउत हा विवाहित असून त्याला तीन अपत्ये आहेत असे फिर्यादीत म्हंटले आहे. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नानासाहेब राउत, अनिल देवकर, हेमंत राउत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Web Title: Rape Case Atrocities on women showing the lure of marriage