Home कोपरगाव घरात घुसून महिलेला मारहाण करत चोरी, गुन्हा दाखल

घरात घुसून महिलेला मारहाण करत चोरी, गुन्हा दाखल

Kopargaon beat up a woman and committed theft

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथे शनिवारी रात्री घरामध्ये एकटी असलेया महिलेला दहा महिला व पुरुष यांनी घरात घुसून मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. तसेच घरातील शोकेश, भांडी, पलंग कपाट अशा १५ हजार किमतीच्या वस्तू चोरून नेल्या.

याप्रकरणी बेबी करीम शेख रा. डाऊच खुर्द कोपरगाव यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सचिन दिलीप दोडकर, अमिना सलीम शेख, सौरभ विकी रोजरियो, उमेश विनोद तायडे, बाबू दत्तू पवार असेच तीन अनोळखी महिला सर्व रा, कालिकानगर शिर्डी ता. राहता या दहा जणांवर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

सचिन दिलीप दोडकर, अमिना सलीम शेख, सौरभ विकी रोजरियो, उमेश विनोद तायडे, बाबू दत्तू पवार या पाचही आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.

Web Title: Kopargaon beat up a woman and committed theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here