Home अहमदनगर Baal Bothe: बाळ बोठे नाशिकमध्ये लपला होता एका हॉटेलात

Baal Bothe: बाळ बोठे नाशिकमध्ये लपला होता एका हॉटेलात

Bal Bothe Case

अहमदनगर (Baal Bothe Case): सामाजिक कार्यकर्त्या रेखा जारे यांची हत्या झाल्यानंतर मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे हा फरार झाला आहे. हा नाशिकमधील एका हॉटेलमध्ये लपला असल्याचा सुगावा लागला होता मात्र पोलीस पथक पोचण्या अगोदरच तो तेथून पसार झाला आहे.

जरे यांची सोमवारी हत्या झाल्यानंतर दोन दिवसांत बोठे यांचे नाव समोर आल्याने तो फरार झाला आहे. तो ज्या हॉटेलमध्ये लपला होता. तेथील सीसीटीव्ही फुटेजाची पोलिसांनी तपासणी केल्याचे समजते. पोलीस पथके त्याचा कसून शोध घेत आहे मात्र तो अजून पोलिसांच्या हाती आलेला नाही.

दरम्यान वकील महेश तवले यांच्यामार्फत बोठे यांचा अटकपूर्व जामीन करण्यासाठी सोमवारी अर्ज करण्यात आला. यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. हा जामिना अर्जासाठी नोटरीवर आरोपीची सही लागते. बोठे यांनी महाराष्ट्रात अन्य शहरातून नोटरी करून वकिलांकडे पाठविल्याची शक्यात आहे.

या प्रकरणात अटक झालेल्या पाच जनांतील ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे व फिरोज राजू शेख त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात देण्यात आली असून सागर भिंगारदिवे, आदित्य सुधाकर चोळके , ऋषिकेश वसंत पवार यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आली आहे.

या आरोपींची मुद्देमाल, सीसीटीव्ही फुटेज तपासणी बाकी असल्याने आठ दिवसांची पोलीस कोठडीत करण्यात यावी अशी मागणी केली आहे. शिंदे याने चाकूने जरे यांच्या गळ्यावर केला होता. शिंदे व शेख हे मारेकरी आहेत.   

Web Title: Bal Bothe was hiding in a hotel in Nashik  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here