Home Accident News Accident: कंटेनर दुचाकीच्या अपघातात नवविवाहिता जागीच ठार

Accident: कंटेनर दुचाकीच्या अपघातात नवविवाहिता जागीच ठार

Kopargaon container motorcycle Accident ladies death

कोपरगाव | Accident:  रक्षाबंधानानिमित्त भावाला ओवाळून राखी बांधण्यासाठी माहेरी आलेली बहिण भावाबरोबर सासरी परतत असताना मालवाहू कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एका बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोपरगाव शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावरील गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावर हा अपघात घडला. मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

प्रियांका सचिन सोळुंके वय २४ रा. मालुंजे खुर्द ता. राहुरी असे या मयत महिलेचे नाव आहे. तिचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रियांका सासरी जात असताना अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्नालयात हलविण्यात आले. कंटेनर चालक फरार झाला आहे. कंटेनर जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Kopargaon container motorcycle Accident ladies death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here