Home क्राईम संगमनेर तालुक्यात घरात घुसून महिलेचा विनयभंग

संगमनेर तालुक्यात घरात घुसून महिलेचा विनयभंग

Sangamner Crime filed Breaking into a house and molesting a woman

संगमनेर | Crime: संगमनेर तालुक्यात मोलमजुरी करणाऱ्या एका २४ वर्षीय महिलेचा घरात घुसून दोघा जणांनी विनयभंग केला असल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत महिलेने आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुनील नाना राखपसारे व संतोष विष्णू राखपसारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हे दोघे घरात घुसले. पिडीत महिलेने आरडाओरडा केल्याने माझे पती, दीर. चुलत सासरे तेथे आले असता त्या दोघांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: Sangamner Crime filed Breaking into a house and molesting a woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here