Home अहमदनगर कोपरगाव: अज्ञात व्यक्तीने पळविले अल्पवयीन मुलीस

कोपरगाव: अज्ञात व्यक्तीने पळविले अल्पवयीन मुलीस

Kopargaon Minor girl kidnapped by unknown person

Ahmednagar | Kopargaon | कोपरगाव: कोपरगाव शहरानजीक असलेल्या संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत मनाई वस्ती येथे रहिवासी असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी शौचालयास जाते असे सांगून गेली ते परत आलीच नाही. तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आपण आपल्या पत्नी व मुले अशा कुटुंबांसोबत रहातो. मंगळवारी २ फेब्रुवारी रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास आपली १७ वर्षीय मुलगी शौचालयास जाते असे सांगून निघून गेली ती परत आलीच नाही. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला पळवून अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. कोपरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Kopargaon Minor girl kidnapped by unknown person

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here