Home अहमदनगर अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार

Kopargaon minor girl was lured away and tortured

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यातील डाउच बु. येथील एका १७ वर्षीय आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनाथ श्रावण शाख असे या गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कॉन्स्टेबल प्रकाश बबन कुढारे यांनी फिर्याद दाखल केली आहे या फिर्यादीनुसार २०१८ ते २०२१ आज पावेतो न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे ते लोणी आहेर वस्ती दरम्यान आरोपीने आदिवासी समाजातील एक १७ वर्षीय मुलीस फूस लावून पळवून नेले.

तिच्याशी बळजबरीने २३ मे २०१९ रोजी आहेर वस्तीवर लग्न करून शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ही मुलगी आठ महिन्याची गरोदर राहिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. नाशिक येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.

Web Title: Kopargaon minor girl was lured away and tortured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here