Home अहमदनगर धक्कादायक: त्या बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला विहिरीत

धक्कादायक: त्या बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला विहिरीत

Rahuri Missing girl's body found in well

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी गावात ऊस तोडणी कामगाराच्या बेपत्ता असलेल्या साडे चार वर्षीय मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी विहिरीत आढळला आहे.

ब्राम्हणी जुना वांबोरी रोडवर ऊस तोडणी कामगारांचा अड्डा आहे. त्यापासून एक हजार किलोमीटर अंतरावर एका विहिरीत मृतदेह आढळून आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी दिली आहे.

शुक्रवारी मध्यरात्री ऊस तोडणी कामगाराची मुलगी झोपडीतून बेपत्ता होती. शनिवारी दिवसभर कुटुंबीयांनी तपास केला असता कोठेही आढळून आलेली नव्हती. शनिवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

श्रीरामपूर पोलीस विभागाचे डीवायएसपी संदीप मिटके व नगर मधील पथक रविवारी सकाळपासून मुलीच्या शोधात होते. दरम्यान आज सोमवारी सकाळी वांबोरी रोड लागत एका विहिरीत बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Rahuri Missing girl’s body found in well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here