Home संगमनेर डागी मंत्र्यांना तातडीने बडतर्फ करा: आ. राधाकृष्ण विखे पाटील

डागी मंत्र्यांना तातडीने बडतर्फ करा: आ. राधाकृष्ण विखे पाटील

rid of tainted ministers immediately Radhakrishna Vikhe Patil

संगमनेर | Sangamner: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केलेला नाही. मुख्यमंत्री म्हणतात पूजा चव्हाण मृत्यू चे सत्य बाहेर आले पाहिजे पण सत्य बाहेर कसे येणार? जर सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केला नाही असा प्रश्न भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

या प्रकरणातील डागी मंत्र्यांना तातडीने बडतर्फ करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी संगमनेरला आ. विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पूजा चव्हाण आत्महत्यावर परखड भाष्य करीत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या घटनेतील गांभीर्य सरकारने घेतले नाही. सत्यात समोर यावी असे वाटत असल तर अजून गुन्हा दाखल का झाला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार आहे. मागील वेळी सुद्धा राष्ट्रवादीचे मंत्री घटनेमध्ये अडकल्यानंतर काय झाले संपूर्ण राज्याने पाहिले आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणे हाच संदेश राज्यात जातोय याचे भान महाविकास आघाडीने ठेवले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: rid of tainted ministers immediately Radhakrishna Vikhe Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here