Home कोपरगाव दोन मुलींचा विनयभंग, दोन गटांत दगडफेक

दोन मुलींचा विनयभंग, दोन गटांत दगडफेक

Kopargaon Molestation of two girls

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव शहरातील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलगी व तिची बहिण या सार्वजनिक शौचालयात गेल्या असता तेथील परिसरातील आरोपींनी फटाके फोडल्याची तक्रार दिल्याने दोन गटांत भांडण होऊन हाणामारी व दगडफेक झाली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दत्त नगर भागात राहणाऱ्या या दोन बहिणी सार्वजनिक शौचालयात गेल्या असता आरोपी मोद्या मंजुळ, सोन्या मंजुळ, गटर मंजुळ, विशाल गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी फिर्यादीशी लगट करून फिर्यादीच्या बहिणीचा हात धरून ओढले. फिर्यादी व तिची बहिण शौचालयात पळत गेल्या असता आरोपी यांनी त्याच्या पाठीमागे जाऊन दरवाजावर थापा मारून उघडा उघडा असे म्हणून विनयभंग करून दमदाटी केली. त्यांनी ह्या प्रकारची माहिती भावाला देऊ असे म्हणाले असता आम्ही तुझ्या भावाला काय तुझ्या बापाला घाबरत नाही असे उद्धट उत्तर दिले. या प्रकारचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या लोकांवर दगडफेक केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

या घटनेवरून वरील चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. यामधील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार झाला आहे.  

Web Title: Kopargaon Molestation of two girls

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here