श्रीघोडेश्वरी मंदिरात ११ लाखाची चांदीच्या मखराची चोरी
घोडेगाव: गुरुवारी मध्यरात्री श्रीघोडेश्वरी मंदिरात धाडसी चोरी झाली. मंदिराच्या मखराच्या १७ किलो चांदी व त्यावरील हिरे असा एकूण ११ लाख रुपयांची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
घोडेगावचे ग्रामदैवत श्रीघोडेश्वरी मंदिरात धाडसी चोरी झाल्याने ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गुरुवारी पहाटे काकडा भजनासाठी आलेल्या भजनी मंडळाच्या महिलांना मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचे आढळून आले. छोट्या दरवाजातून दर्शन घेताना चांदीची मखर दिसून आली नाही. त्यांनी ही बाब पुजारी आदिनाथ माने यांना सांगितले. त्यानंतर तेथे चोरी झाल्याचे समजले.
करोनाने गेली सात महिने बंद असलेली मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्यानंतर दोनच दिवसांत धाडसी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पथक येऊन पाहणी व नमुने घेऊन गेले.
Web Title: Shri ghodeshvari Temple theft