Home राहाता व्यावसायिकावर सस्तुरने वार करत हल्ला, व्यावसायिक जखमी

व्यावसायिकावर सस्तुरने वार करत हल्ला, व्यावसायिक जखमी

Rahata Attack on businessman by Sastur

राहता | Rahata: राहता शहरातील घोलप मंगल कार्यालयाजवळ बुधवारी राहता शहरातील सलून व्यावसायिक रवींद्र मखाना यांच्यावर सस्तुरने वार केला आहे. अंधाराचा फायदा घेत दोन अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केला आहे.

याप्रकरणी रवींद्र मखाना वय ४१ यांनी राहता पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार मखाना हे दुकानातील काम आटोपून घरी जात असताना घोलप मंगल कार्यालयाजवळ आले असता रांजणगावाच्या दिशेने चेहरा बांधून दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलवरून आले. त्यांनी मखाना यांच्यावर पाठीमागून लोखंडी हत्याराने वार केले. त्यानंतर खाली पाडून अनोळखी व्यक्तीने शिवीगाळ व दमदाटी केली. त्यांनंतर दोन्ही पायांवर वार केले. यामध्ये तो जखमी झाला. त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. शिर्डी येथील रुगणालयात पोलिसांनी मखना यांची भेट घेऊन फिर्याद दिली आहे.

मखाना हे हिदुत्ववादी चळवळीचे कार्यकर्ते आहेत. त्याचे कुटुंबही या हिंदुत्ववादी चळवळीचे कार्यकर्ते आहे. मखाना यांच्यावर हल्ला का करण्यात आला याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.   

Web Title: Rahata Attack on businessman by Sastur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here