संगमनेर तालुक्यातील घटना: शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्याच्या पठार भागात गुंजाळवाडी पठार शिवारात जनावरांना पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
धनंजय दादाभाऊ आगलावे वय २२ रा. गुंजाळवाडी पठार असे मयत तरुणाचे नाव आहे. गुंजाळवाडी पठार येथे दादाभाऊ गोपीनाथ आगलावे यांचे शेत आहे. घराच्या पाठीमागे शेततळे आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धनंजय हा जनावरांना पाणी पाजायचे असे आईला सांगून शेततळ्यावर गेला होता. शेततळ्यातून पाणी काढताना धनंजयचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडल्याने त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
नागरिकांनी मृतदेह बाहेर काढून मृतदेह शवविचेदानासाठी संगमनेर येथे कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद केलीं आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले हे करीत आहे.
Web Title: Sangamner Young man drowns in farm